Next
साबुदाण्याचे लाडू आणि दाण्याचे थालीपीठ
वसुधा गवांदे
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story

नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. काही मंडळी तर नऊ दिवस सलग उपवास करतात. म्हणूनच आज मी उपवासाचे दोन वेगळे पदार्थ सांगणार आहे. तुम्ही साबुदाण्याची खिचडी आणि दाण्याची आमटी करत असाल. आज मी तुम्हाला साबुदाण्याचे लाडू आणि दाण्याचे थालीपीठ कसे करायचे, ते सांगणार आहे.
लाडवासाठी एक वाटी साबुदाणा घ्या. तो चांगला भिजला की नारळाचे पाणी घालून सारखा करा. त्यात साखर किंवा गूळ, ओला नारळ घालून कालवा. कढईत एक मोठा चमचा तूप गरम करून घ्या. त्यात हे शिजवा व लाडू वळण्याइतपत झाले की उतरवा आणि गार झाले की लाडू वळा. साबुदाण्याचे लाडू फार छान लागतात.
दाण्याच्या थालीपिठासाठी ओले शेंगदाणे बारीक वाटून घ्या. त्यात उकडलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा थोडा ठेचा किंवा बारीक तुकडे, चवीपुरते मीठ, जिरे आणि थोडे ओले खोबरे घालून कालवा. पीठ घट्ट होण्यासाठी वरून शिंगड्याचे पीठ थोडे घाला व त्याची थालीपिठे थापा. उपवासाचे वेगळे पदार्थ म्हणून तुम्ही हे पदार्थ करून बघू शकता. उपवास नसलेल्यांनाही हे पदार्थ आवडू शकतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link