Next
आठवडानोंदी
संग्राहक - प्रसाद भडसावळे
Friday, September 20 | 04:00 PM
15 0 0
Share this story


२१ सप्टेंबर : पं. जितेंद्र अभिषेकी यांचा ९१वा जन्मदिन (१९२९) / अभिनेत्री शकिला यांचा दुसरा स्मृतिदिन (२०१७) / जागतिक शांतता - अहिंसादिन / जागतिक अल्झायमर रोगनिवारणदिन.


२२ सप्टेंबर : कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती (१८८७) / विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर यांचा १११वा जन्मदिन (१९०९) / सतारवादक उस्ताद उस्मान खान यांचे ८०व्या वर्षात पदार्पण (१९४०) / जागतिक कारमुक्तीदिन / अयनदिन : दिवस-रात्र समान / रोझ डे - राष्ट्रीय गुलाबदिन.


२३ सप्टेंबर : भारतीय संघटित कामगार चळवळीस १३५ वर्षे पूर्ण. रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे गिरणी कामगारांच्या संघटनेचे संस्थापक (१८८४) / डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास व प्रेरणा यातून ग्रंथालयक्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणारे ग्रंथपाल, ग्रंथालय सल्लागार, लेखक शांताराम शंकर रेगे यांच्या जन्मशताब्दीवर्षाची सांगता (१९१९) / शिक्षणतज्ज्ञ, पुणे विद्यापीठाचे दहावे कुलगुरू देवदत्त अच्युत दाभोलकर यांच्या जन्मशताब्दीवर्षाची सांगता (१९१९) / प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिकचे संस्थापक, नाट्यकला, विज्ञान, अध्यात्म या क्षेत्रातील व्यासंगी प्रा. भालबा केळकर याच्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ (१९२०) / अभिनेत्री तनुजा यांचे ७७व्या वर्षात पदार्पण (१९४३) / आदिवासींच्या कल्याणासाठी कार्यरत असलेले डॉ. अभय बंग यांचे ७०व्या वर्षात पदार्पण (१९५०) / सर्पमित्र नीलिमकुमार खैरे यांचा ६८वा वाढदिवस (१९५१) / लष्करात हा दिवस ‘हैफादिन’ म्हणून साजरा. १९१८ रोजी पहिल्या महायुद्धात लढल्या गेलेल्या या हैफायुद्धामध्ये भारताचे ४४ जवान मारले गेले. त्यांचे हे स्मारक आहे. या घटनेस १०१ वर्षे पूर्ण / आंतरराष्ट्रीय वाघ-बिबट्यादिन / विषुवदिन : दक्षिणगोलारंभ.

२४ सप्टेंबर : महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संस्थेची १४६ वर्षे पूर्ण (१८७३) / इंग्लिश खाडी पाहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू आरती साहा यांचा ८०वा जन्मदिन (१९४०) / जागतिक कर्णबधिर जागरूकतादिन / जागतिक प्रीतिभेटीचा दिवस / जागतिक स्वच्छतादिन /


२५ सप्टेंबर : रयत शिक्षण संस्थेचे १०१व्या वर्षात पदार्पण (१९१९) / इस्रोचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश धवन यांच्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ (१९२०) / पत्रकार, संपादक, ललित लेखक माधव गडकरी यांचा ९२वा जन्मदिन (१९२८) / भारतीय ग्राहकचळवळीचे जनक बिंदुमाधव जोशी यांचा ८७ वा जन्मदिन (१९३२) / महाराष्ट्राचे पहिले पोलिस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेढेकर यांचा दुसरा स्मृतिदिन (२०१७).


२६ सप्टेंबर : भौतिकशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर यांचा जन्मदिन (१९०८) / रसायनशास्त्रज्ञ व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. बाळ दत्तात्रय टिळक यांचा जन्मदिन. ग्रामीण विकासासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात त्यांनी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय होते. (१९१८) / लेखक, आयुर्वेदअभ्यासक, प्राचार्य अनंतराव दामोदर आठवले ऊर्फ स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ (१९२०) / माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे ८८व्या वर्षात पदार्पण (१९३२) / पुरातत्त्वशास्त्रज्ञ शरद नरहर राजगुरू यांचा जन्मदिन (१९३३).


२७ सप्टेंबर : डॉ. राजा राममोहन राय यांचा स्मृतिदिन / राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा स्थापनादिन (१९२५) / शिक्षणतज्ज्ञ शं. ना. नवलगुंदकर यांचे ८५व्या वर्षात पदार्पण (१९३५) / साहित्यिक, संपादक विजय हरी वाडेकर यांचा ८१वा जन्मदिन (१९३९) / गायक-नट गंगाधर लोंढे यांचा स्मृतिदिन (१९४४) / इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा पराक्रम करणारे पहिले भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांच्या मोहिमेस ७१ वर्षे पूर्ण. भारतीय सागरी मोहिमांची मुहूर्तमेढ रोवणारे जलतरणपटू (१९५८) / जागतिक पर्यटनदिन / जागतिक वृक्षलागवडदिन / राष्ट्रीय ग्रंथालयदिन.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link