Next
अभिनंदन पुन्हा ‘मिग२१’वर स्वार
प्रतिनिधी
Friday, August 23 | 02:00 PM
15 0 0
Share this story


पाकिस्तानच्या ‘एफ१६’ या झंझावाती विमानाला आपल्या मर्यादित शक्तीच्या जोरावरही धूळ चारणारे भारतीय हवाई दलातील झुंजार विंगकमांडर अभिनंदन वर्तमान पुन्हा एकदा ‘मिग २१’ विमानावर स्वार झाले आहेत. भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी नुकतेच विंगकमांडर अभिनंदन यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
बालाकोटच्या दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई दलाने हवाई हल्ला चढवल्यानंतर  २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानने भारतीय भूमीत धाडलेल्या ‘एफ १६’ विमानाचा समाचार विंगकमांडर अभिनंदन यांनी ‘मिग २१ बायसन’ विमानाद्वारे घेतला होता. विमानातून पाक भूमीत उतरलेले अभिनंदन यांनी या कसोटीच्या प्रसंगालाही धीरोदात्तपणे तोंड दिले. राजनैतिक दबावापुढे झुकत पाकिस्तानने अभिनंदन यांना १ मार्च रोजी भारताच्या हवाली केले. पाकिस्तानातून परतल्यानंतर अभिनंदन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मिग २१ विमानाच्या कॉकपिटमधून आसनासह बाहेर फेकले जाताना शरीराला मोठी इजा होते. त्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झालेले अभिनंदन सहा महिन्यांनंतर पुन्हा लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये बसण्यास सज्ज झाले आहेत. बंगळुरूस्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन मेडिसीन’ने त्यांना पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर ते भारतीय हवाई दलाच्या राजस्थानातील हवाई तळावर कार्यरत झाले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link